| पोयनाड | प्रतिनिधी |
पोयनाड विभाग मंडळ अधिकारी कार्यालया मार्फत पोयनाड आदिवासीवाडी, पोयनाड बाजारपेठ येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. संपूर्ण पोयनाड गावातून मतदारांना येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यांसाठी जनजागृती यात्रा काढून आव्हान करण्यात आले, लोकशाहीचा जागर आणि संविधानाचा आदर प्रत्येकाला करायचा आहे. चला उठा जागे व्हा लोकशाही बळकट करण्यासाठी स्वाभिमाने प्रत्येकांनी मतदान करा असे आव्हान मंडळ अधिकारी कार्यालया मार्फत करण्यात आले.
मतदार बंधू आणि भगिनींनी व 18 वर्षावरील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे. आपण सर्वानी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे व आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीतजास्त मतदान करावे असे आव्हान मंडळ अधिकारी कार्यालया मार्फत लोकांना करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी पोयनाड तलाठी सजाचे मंडळ अधिकारी महेश निकम, आर.एन पाटील तलाठी पोयनाड, पोयनाडचे माजी सरपंच भूषण चवरकर, पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सदस्य व ग्राम.पंचायत सदस्य किशोर जैन, डॉ.मोनाली चवरकर, माजी सदस्य विजेंद्र तावडे, पोयनाड ग्रामस्थ अजय टेमकर, अँड.पंकज पंडित, रोहन धुमाळ, उदय चवरकर, विनोद राऊत, जितेंद्र जैन, धनंजय चवरकर, बी.एल.डी अश्विनी राऊत, प्रतिभा चवरकर, मोजेस नवगावकर यांच्या सह पोयनाड येथील आदिवासी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.