| नवी दिल्ली । वृत्तसंस्था |
टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड येत्या काही दिवसांत होणार आहे. आणि योग्य वेळी यशस्वी जयस्वालने शानदार शतकी खेळी करून आपली दावेदारी सिद्ध केली. या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अपयशी ठरत असलेल्या जयस्वालने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 60 चेंडूत नाबाद 104 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने 7 षटकार 9 चौकार मारले.
आयपीएल अगोदर झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन द्विशतके करत कमालीचा फॉर्म दाखवणारा जयस्वाल आयपीएलमध्ये प्रभाव पाडू शकला नव्हता. त्यामुळे टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता मावळत चालली होती, ऐन मोक्याच्या क्षणी त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर शतक करून त्याचीही वाहवा मिळवली.