| खरोशी | प्रतिनिधी |
35 वर्षांच्या प्रदीर्घ सेनेनंतर रंजना अमरचंद पाटील यांचा पेण तालुक्यातील उचेडे शाळेत सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. माजी गट शिक्षणाधिकारी पी.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे खास आकर्षण सुगम संगीत सादरकर्ते स्वरभक्ती कलामंच पेण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरानी रंजना पाटील यांनी केलेल्या कार्याचे मनभरून कौतुक केले. बाईचा स्वभाव शांत व मनमिळावू असल्याने विद्यार्थी व शिक्षक वृंदामध्ये त्या लोकप्रिय होत्या. सेवा केलेल्या प्रत्येक शाळेवर त्यांनी आपला ठसा उमटवला होता. उंबर्डे केंद्रातील शिक्षक वर्गाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.