सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| कोर्लई | वार्ताहर |
अलिबाग-मुरुड रस्त्यावर मजगांवमध्ये अंदाजे 50 वर्षे जुने असलेल्या पुलाला गेल्या अनेक महिन्यांपासून झाडाझुडपांचा विळखा असून याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
मुरुड-जंजिरा पर्यटनात अलिबाग-मुरुड रस्त्यावर असलेल्या या पुलावरून शनिवार रविवार तसेच, सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या पुलाला गेल्या अनेक महिन्यांपासून झाडाझुडपांचा असलेला विळखा हटविण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष पुरवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी जोर धरीत आहे.







