| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड कुंभारवाडा येथील कुंभार समाजाच्यावतीने श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी श्री संत गोरा कुंभाराची पोथी पूजन, भजन, सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. तद्नंतर शेकडो भक्तांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.
समाज अध्यक्ष अरुण म्हसळकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, 55 वर्ष संत गोरा कुंभार पुण्यतिथी आम्ही उत्साहात साजरी करीत आहोत. संत शिरोमणी गोरोबाकाका यांनी समाजासाठी खूप त्याग करुन कुंभार समाजाला बहुमान प्राप्त करुन दिला. जिथे स्वच्छता, भाविक आणि उत्साह असतो, अशाच ठिकाणी संतांच वास्तव्य असत. कवडीमोल मातीला सर्वोच्च ठिकाणी बसविण्याचे महत्त्वाचे काम माझा कुंभार समाज बांधवच करु शकतो, याची अनेक उदाहरणे देता येतील, असे अभिमानाने अरुण म्हसळकर यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीस्त पत्र देऊन सत्कार करण्यात येते.
यावेळी कुंभार समाज अध्यक्ष अरुण म्हसळकर, नारायण बिरवाडकर, दत्तात्रेय राजपुरकर, दिलीप धाटावकर, शशिकांत बिरवाडकर, रामकृष्ण राजपूरकर, संदीप राजपूरकर, लक्ष्मण म्हसळकर, राहुल धाटावकर, महिला मंडळ व समाजबांधव आदी उपस्थित होते.