रोटरी क्लब आँफ खोपोलीचा संकल्प
। खोपोली । प्रतिनिधी ।
रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्यावतीने री-फॉरेस्टींग सह्याद्री या उपक्रमात अंतर्गत धाकटी पंढरी ताकई येथील वनविभागाच्या जागेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते 100 वृक्षलागवड करीत तालुक्यातील एक हजार वृक्ष लागवड करण्याच्या उपक्रमाला प्रारंभ केला.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ खोपोली अध्यक्ष सुरेश खेडकर, सेक्रेटरी सुरेंद्र जोशी, अनिल खालापूरकर, सुधीर पाटील, डॉ.रविंद्र टिळक, संजय पाटील, इनरव्हिल क्लब अध्यक्षा सुचेता जोशी आदी प्रमुखांसह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. वृक्ष तोडीमुळे मानवी स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने कोरोना महामारीत ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे काळाजी गरज आहे. ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने हा वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
खालापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत उभी राहिल्याने मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे. रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्यावतीने री-फॉरेस्टींग सह्याद्री या उपक्रमात अंतर्गत तालुक्यात एक हजार वृक्ष लागवड करण्याचा केलेला संकल्प स्वागतार्ह आहे.
अतुल पाटील, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस