| मुंबई | प्रतिनिधी |
अहमदनगरमध्ये खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. देशात मोदी हे प्रचाराच्या नावाखाली धुडगूस घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवलेली नाही. मोदींची तब्येत ठीक नाही, त्यांची गाडी रूळावरून घसरलेली आहे. मोदींनी एकाही सभेत काम केल्याचा आढावा दिला नाही. काळा पैसा नष्ट करणाची वल्गना करणारे मोदी काळा पैसा काँग्रेसला दिला अस सांगतात. याबद्दल माहिती आहे त्यांना आणि त्याची चौकशी करत नाही. मोदींनी ज्यांच्यावर याप्रकरणी आरोप केलेत, त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. 4 जूनपर्यंत शिंदे यांना काय तांडव करायचा आहे ते करू देत. शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता 4 जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावा राऊतांनी केला आहे.
अजित पवारांना खोटे बोलण्याची सवयच लागली आहे, असा घणाघात राऊतांनी घातली. ते भाजप सोबत गेले आहेत. भाजपमध्ये खोटे कोण बोलू शकते हे एकमेव क्वालीफिकेशन लागते. सांगलीमध्ये चंद्रहार पाटील निवडूण येणार आहेत. सांगलीमध्ये कोण काय केले आहे याचा रिपोर्ट ठाकरेंकडे आला आहे. शिवसेना कोणताही काम अर्धवट सोडत नाही.






