| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील उसरघर गावचे सुपुत्र तथा विवा कॉलेजचे माणगावचे प्राचार्य विवेक ढेपे यांना आविष्कार फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार, दि.12 मे रोजी सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बाजी प्रभू देशपांडे चौक, पन्हाळगड, जि. कोल्हापूर याठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. विवेक ढेपे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या पुरस्कार सोहळ्याला फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार, राज्य पुरस्कार निवड समिती सदस्य माधुरी सावंत, फाऊंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते आदी मान्यवरांसह राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.