। पाली । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली हा राज्य महामार्ग क्र. 548 (अ) असून हा मार्ग एकूण 39 किलोमीटर लांबीचा आहे सदर रस्त्याचे काम 2016 पासून शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले असून गेली चार वर्षे होऊन देखील या महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरूच आहे, त्यात अनेक निष्पापांचा बळी जात आहेत तर काहींना अपंगत्व आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा सचिव-महिला आघाडी,लता कळंबे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे विरोधात 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी त्याच्या कर्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा निवेदन नुकतेच देण्यात आले.
शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा मार्ग संपूर्णपणे क्रॉक्रेटचा करण्यात येत आहे. यासाठी शासनाकडून सुमारे 198 कोटीची तरतूद ही करण्यात आली आहे. या मार्गावर देवन्हावे, मिरकुटवाडी,इमॅजिका,उंबरे,गोंदाव फाटा,दुधानेवाडी,रासळ,पाली,बलाप व राबगाव या गावांजवळ रस्ता खूप खराब झाला आहे. तसेच इतर ठिकाणी देखील खड्डे आहेत. यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत.