। सुतारवाडी । वार्ताहर ।
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दि. 22 सप्टेंबर रोजी महाश्रमदान मोहिमेचे आयोजन प्राथमिक शाळा येरळचे मुख्याध्यापक खेमसिंग चव्हाण तसेच त्यांच्या सहकार्यांनी केले होते. या मोहिमेंतर्गत येरळ ग्रामपंचायत हद्दीतील येरळ गावातील शाळेचा परिसर, गावातील अंतर्गत रस्ते, तसेच सार्वजनिक ठिकाणच्या परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत आदर्श प्राथमिक शाळा येरळचे मुख्याध्यापक खेमसिंग चव्हाण, येरळ गावचे अध्यक्ष विजय साळुंखे, संगीता सावंत, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास शिंदे, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग, शिक्षक अब्दागिरे, शिक्षिका बुधवंत त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी शासनाचे नियम पाळून सहभाग घेतला होता.