30 लाख रुपयांच्या रोकडसह 20 तोळे सोने लुटले
। यवतमाळ । वृत्तसंस्था ।
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एका घरातील कुटुंबावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यात 30 लाख रुपयांची रोकड तसेच, 20 तोळे सोने लुबाडले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
यवतमाळमधील महागाव तालुक्यातील चिल्ली ईजारा येथील जंगलात एक शेतकरी कुटुंब अनेक वर्षांपासून राहत आहे. त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत कापसाचे पीक घेतले होते. कापूस विक्रीतून मिळालेली रक्कम आणि सोन त्यांच्या घरात होते. मध्यरात्रीच्या सुमारास सहा जण घरात धुसले. त्यांनी घरात राहणाऱ्या संतोष पांडे आणि त्यांच्या दोन बहिणींना मारहाण केली. तसेच तलवार आणि बंदूक दाखवून घरातील रोख रक्कम 30 लाख रुपये आणि सोन घेऊन पळून गेले.
या सर्व प्रकारानंतर पांडे कुटुंबीयांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून महागावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव याप्रकरणी कसून तपास करत आहेत.