रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद
| रेवदंडा | वार्ताहर |
उसर गेल इंडियामध्ये 14 जुन जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने जिल्हा सामान्य रूग्णालय अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्यावतीने 14 जुन रोजी होणाऱ्या जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून फर्स्ट एड सेंटर, गेल इंडिया लिमिटेड उसर या ठिकाणी गेल इंडिया लि. महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल अनुज गुप्ता, महाप्रबधंक जितिन सक्सेना, मुख्य प्रबधंक वरिष्ठ अधिकारी अपूर्व निंबाळकर, सहाय्यक अधिकारी सुजन ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व जिल्हा सामान्य रूग्णालय रायगड-अलिबाग यांचे सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते.
उसर गेल इंडिया कंपनीच्या फर्स्ट एड सेंटरमध्ये सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिरास सुरूवात झाली, प्रारंभी गेल इंडिया लिमिटेड उसर या ठिकाणी गेल इंडिया लि. महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल अनुज गुप्ता, महाप्रबधंक जितिन सक्सेना, यांनी सुध्दा रक्तदान केले. यावेळी एकूण 33 रक्तदात्याने रक्तदान करून आयोजीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरास जिल्हा सामान्य रूग्णालय अलिबाग यांच्यावतीने रक्त संक्रमण पतपेढीचे डाँ. दिपक गोसावी, वैभव कांबळे, अभिषेक घरत, सुशांत भगत, मंगेश पिंगळा, साक्षी मयेकर, सुनिल म्हात्रे व गेल इंडिया लि.वतीने सहाय्यक अधिकारी सुजन ठाकूर, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी व सहकारी प्रणाली तळेगांवकर यांचे विशेष सहकार्य लाभले.