| चिरनेर | प्रतिनिधी |
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्मरणात रहावा यासाठी, चिरनेर, आवरे, पिरकोन तसेच या भागातील अन्य शाळांमधून पहिल्या दिवशी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या जयवंती गोंधळी यांनी या भागातील प्राथमिक शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या भागातील राजिपच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्ता तसेच शालेय स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम वर्षभर शाळेत राबविले जात असल्याचे येथील शाळांच्या मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले.
देविदास म्हात्रे यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ वह्यांचे वाटप केले. यावेळी बबन पाटील, निर्भय म्हात्रे, देविदास म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, डी.ए. गावंड, शंकर पाटील, प्रमोद म्हात्रे, जयवंती गोंधळी, ज्योती ठाकूर, अलका गावंड, माई म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे, अरुणा पाटील, सीमा कोल्हे श्री आहेर, गणेश प्रसाद गावंड, समर्थ गावंड, नरेश पाटील, प्रियांका पाटील, वर्षा गावंड, करिष्मा गावंड, सचिन गावंड मनीषा पाटील, पूनम पाटील, मानसी म्हात्रे, संहिता कोळी, ज्योती बामणकर आदी विविध शाळांतील शिक्षक आणि शाळा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.