चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी संकुलात आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. शारीरिक आणि मानसिक समृद्धी प्रदान करणारा योगा हा आज जागतिक स्तरावर माणसाचे जीवन समृद्ध करणारी नवी संजीवनी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 21 जून रोजी पीएनपी वेश्वी संकुलात सर्व इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांनी योगा डे साजरा केला. या प्रसंगी संकुलातील विद्यार्थ्यांनी बसून व उभे राहून वेगवेगळी आसने केली तसेच, योगामधून नृत्याविष्काराचे सादरीकरण करुन उपस्थितांना संदेश दिला.
योगा प्रशिक्षक सिद्धी वाकडे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रविंद्र पाटील, होली चाईल्ड सीबीएसईच्या मुख्याध्यापिका व्ही. वेणी, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, प्रा. वृतिषा पाटील, इंग्रजी माध्यम ॲकॅडमिक को ओर्डीनेटर श्रुती सुतार, मनिषा रेलकर संकुलातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.