। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.राजीव साबळे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त व डॉक्टर्स डे या दिवसाचे औचित्य साधून सोमवारी (दि.1) माणगाव तालुक्यातील डॉक्टरांचा संस्थेतर्फे द.ग.तटकरे महाविद्यलयात संस्थाध्यक्ष अॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माणगाव मेडिकोजचे अध्यक्ष डॉ.अभिजित मेहता, डॉ.आबासाहेब पाटणकर, डॉ.सचिन चव्हाण, डॉ.संताजी यादव, डॉ.नितीश सावंत, डॉ.मोघल हसन, डॉ.सचिन मेहता, डॉ.आदेश घोणे, डॉ.सुनीता कोकणे, डॉ.क्षमा मेहता, डॉ.पूजा सावंत आदी डॉक्टरांचा संस्थाध्यक्ष अँड. राजीव साबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक नितीन बामगुडे, डॉ.आबासाहेब पाटणकर, विरेश येरुणकर, रत्नाकर उभारे, बबन खामकर, शिपूरकर अरुण पवार, सुधाकर शिपूरकर व गणेश वाघरे, मनीषा मोरे, गंगुबाई शिंदे, निशिगंधा मयेकर, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.







