| रसायनी | वार्ताहर |
मुसळधार पावसामुळे दांड-रसायनी रस्त्यालगत असणारा दांडजवळचा जुनाट महाकाय वृक्ष उन्मळून एका पिकअप रिक्षावर पडल्याने रिक्षातील एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
दांडफाटाजवळ रस्त्यालगतचा वृक्ष उन्मळून पडल्याने याचवेळी आलेली पिकअप रिक्षा झाडाच्या फांद्यांच्या संपर्कांत आली. दैव बलवत्तर म्हणून रिक्षातील एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना रसायनी पोलीस ठाण्याचे पीआय संजय बांगर यांना समजताच त्यांनी तात्काळ फायर ब्रिगेडचे अधिकारी मोरे यांना फोन करुन संपर्क साधला आणि घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पीएसआय धोंडे, गोपनीय अंमलदार राहुल भडाळे, पोलीस वळवी, पोलीस बाई धुळधर, पोलीस डफळ यांच्यासह अपघातग्रस्त टीम रसायनी, आयआरबी टीम सदस्यांनी उपस्थित राहून रस्त्यावर कोसळलेल्या महाकाय वृक्षाच्या फांद्या काढून जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केल्या. यावेळी काहीवेळ वाहतूक ठप्प होती. परंतु, रसायनी पोलिसांच्या सतर्कतेमुळे रस्त्यावर उन्मळून पडलेला महाकाय वृक्ष बाजूला करुन वाहतूक सुरळीत केल्याने प्रवाशांनी कौतुक केले.