। पनवेल । वार्ताहर ।
रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल 2024-25 अध्यक्ष पदग्रहणाचा सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला. महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. सचिव म्हणून रोटेरियन प्रतिभा सोमवंशी म्हणून पदभार स्विकारला.
रायगड जिल्हा-3131 रोटरीचे गव्हर्नर शितल शहा, माजी गव्हर्नर डॉ. अनिल परमार, असिस्टंट गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे व कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे सभापती नारायण घरत उपस्थित होते. तसेच पनवेलचे बांधकाम व्यावसायिक विलास कोठारी, मनोहर कांडपिळे, रोटरी नविन पनवेलचे सर्व पदाधिकार्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच आनंदी ग्रुपचे सर्व पदाधिकारी दशरथ म्हात्रे, अभिषेक भोपी, मोतीराम कोळी, भीमराव पवार, उद्योगपती राहुल पारगावकर, प्रसन्ना वैद्य व आनंदी ग्रुपचे अन्य सदस्य उपस्थित आहे. हा सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला. दरम्यान, विशेष आभार प्रदर्शन सुरेश शेडगे व सूत्रसंचालन प्रदीप डावकर यांनी केले.