| लंडन | वृत्तसंस्था |
नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी टेनिसकोर्टवर न उतरताच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीतील त्याचा प्रतिस्पर्धी अॅलेक्स दी मिनॉरने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे जोकोविचला पुढल्या फेरीत स्थान मिळाले आहे. जोकोविचने 13व्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. याचसोबत रॉजर फेडररच्या विक्रमाचीही त्याने बरोबरी केली. फेडररने सर्वाधिक 13वेळा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली होती. टेलर फ्रिट्झ व लोरेंझो मुसेटी यांच्यामधील विजेत्याविरुद्ध जोकोविचला उपांत्य लढत खेळावी लागणार आहे.