| पुणे | प्रतिनिधी |
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ. सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आरव बापट, शरण्या पटवर्धन, वरदान कोलते, शौनक सानपूरकर, संतोष वाक्राडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 11 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित आरव बापटने अव्वल मानांकित नमन अग्रवालचा 10-12, 11-8, 11-5, 12-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 15 वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धन हिने शगुन गणेशेचा 11-7, 11-6, 1-7 असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. शरण्या ही बाल शिक्षण शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून, एमडब्ल्यूटीटीए येथे सराव करते.
15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत सातव्या मानांकित वरदान कोलतेने नवव्या मानांकित नीरज नांदेडेचा 11-6, 7-11, 11-7, 11-5 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. वरदान हा एज्युकॉन इंटरनॅशनल शाळेत शिकत असून, लक्षवेध टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक अनिल बांदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित शौनक सानपूरकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दहाव्या मानांकित शौरेन सोमणचा 11-8, 12-10, 6-11, 11-7, 11-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 40 वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम सामन्यात सातव्या मानांकित संतोष वाक्राडकरने अव्वल मानांकित स्वानंद बेडेकरचा 11-7, 11-8, 9-11, 13-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. अमेय येरवडेकर राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, डॉ. उदय भालचंद्र, श्रीराम कोनकर, आशिष बोडस, डॉ. मोहन उजगावकर, अजय सिधये, मधुकर लोणारे, सुरेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.







