शिवाजी ठाकूर, अर्पिता पाटील यांचा गौरव
| रसायनी | वार्ताहर |
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजाचा दरवर्षी पावसाळ्यात शेतकर्यांच्या शेताच्या बांधावर जावून रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लब सत्कार समारंभ करीत असताना यावर्षीही खालापूर प्रेस क्लबच्यावतीने 12 जुलै रोजी खालापूर तालुक्यातील वयाल येथील शेतकरी शिवाजी ठाकूर तसेच परखंदे येथील महिला शेतकरी अर्पिता पाटील यांचा शेताच्या बांधावरती आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई ओव्हाळ, प्रवीण जाधव, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, सचिव रवींद्र मोरे, उपाध्यक्ष एस.टी. पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष काशिनाथ जाधव, खजिनदार समाधान दिसले, सहखजिनदार संतोषी म्हात्रे, सहसचिव राज साळुंके, प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे आदींनी मेहनत घेतली. खालापूर प्रेस क्लबच्या वतीने झाड, शाल, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शेतकरी शिवाजी काथोर ठाकुर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय, कुक्कुट पालन, भाजीपाला पिकवणे, शेतात विविध प्रकारचे कडधान्ये व पाळीव पशुसाठी लागणारे अन्न हे शेतात पिकविले आणि वृक्षलागवड केली आहे. अर्पिता अमित पाटील यांनी महिला असताना शेती टिकून ठेवली असून, दुग्धव्यवसाय, विविध प्रकारचे कडधान्ये, भाजीपाला लागवड, वृक्षलागवड, नाचनी, भेंडी, सूर्यफुल आदी उपक्रम शेतात राबविल्याने त्यांच्या या शेती व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत खालापूर प्रेस क्लबने 12 जुलै रोजी गौरव करण्यात आला.
यावेळी टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच निखील पाटील, माजी उपसरपंच रोशन गायकवाड, सदस्य महेंद्र मोरे, अपर्णा पवार, ग्रामसेवक गोलुकदास राठोड, कृषी परिवेशक नितीन महाडिक, कृषी सहाय्यक सुमित भगत, रवींद्र देशमुख तसेच होराले सरपंच नीलम भूईकोट, उपसरपंच नागेश पाटील, सामजिक कार्यकर्ते शंकर मानकवले, ललिता जाधव, सुरेखा दळवी, वैशाली खराडे, अविराज बुरूमकर, पत्रकार बाबू पोटे, हनुमत मोरे, संदिप ओव्हाळ, अर्जुन कदम, सारिका सावंत, संतोष शेवाळे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





