| आगरदांडा | प्रतिनिधी |
महिलांचे सरंक्षण व त्यांची प्रगती यासाठी महाराष्ट्र सरकार सदैव तत्पर असते. नुकतीच महाराष्ट्र सरकारतर्फे महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमार्फत महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत.
याच योजनेची जनजागृती व जास्तीस्त जास्त महिलांना याचा लाभ मिळावा या हेतूने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स मुरुड जंजिरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 जुलै रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंगणवाडी सेविका आरती लोटणकर यांनी योजनेची संपूर्ण माहिती व लागणारी आवश्यक कागतपत्रे याची माहिती देऊन ऑनलाइन फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयातील मुलींना देण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मार्फत सदर योजनेचा प्रसार आणि प्रचार मुरुड परिसरातील गावखेड्यांमध्ये होऊन अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ व्हावा, या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरोज शेख यांनी प्रास्ताविकाद्वारे योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. रहिम बागवान यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला विकास कक्ष प्रमुख डॉ. स्वाती खराडे व विद्यार्थी प्रतिनिधी हुमेरा घारे, सहिमा मुकादम, अरफा कलबसकर यांनी परिश्रम घेतले.