| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील तक्का परिसरातून एक मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. कमलाकर साळुंखे यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्र. एमएच-46-टी-5574 ही ब्ल्यू स्टार गॅरेज शॉप नं.2, चॅनल एलीजेन्स तक्का येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.