रुग्णसंख्या 20 हजारांखाली
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाग्रस्तांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशातील नवी कोरोना रुग्णसंख्या 20 हजारांच्या खाली आली आहे. मृताची संख्याही कमी झाली आहे. महाराष्ट्र आणि केरळमधील रुग्णसंख्या कमी होत आल्यामुळे देशातील नव्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात नवे 18 हजार 795 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 179 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 26,030 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मागील 24 तासांत देशात आढळलेल्या रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण केरळमधील आहे. केरळमधील रुग्णसंख्यामध्ये कपात होत असली तरीही देशाच्या रुग्णसंख्येपैकी 60 टक्के रुग्ण केरळमधील आहेत. मागील 24 तासांत केरळमध्ये 11 हजार 699 रुग्ण आढळले आहेत. तर 58 जणांचा मृत्यू झाला आहे.