। अलिबाग । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी चौल येथील शिवलकर कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद रघुनाथ शिवलकर यांच्या मातोश्री सुलोचना रघुनाथ शिवलकर यांचे 7 जुलै रोजी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 92 वर्षे होते.
सुलोचना रघुनाथ शिवलकर यांचे निधन झाल्याचे समजताच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी अरविंद शिवलकर यांच्या चौल येथे राहत्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, चौल येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मधुकर काटकर, अनिल पाटील, द्वारकानाथ नाईक, आंबेपूरचे प्रकाश खडप, पप्पू पाटील, प्रशांत जाधव, रमेश नाईक, ओम प्रकाश पाटील आदी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.







