| पनवेल | वार्ताहर |
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातून कोणी तरी अज्ञात इसमाने फूस लावून एका 17 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या मुलाचे नाव समर शैलेश पोतनीस (17, रा. शासकीय वसाहत, बांद्रा), रंग गोरा, उंची 5 फूट 6 इंच, बांधा सडपातळ, अंगात पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व बिस्किट रंगाची फॉर्मल पॅन्ट घातलेली आहे. त्याला इंग्रजी, मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक अंकुर शेलार मो.नं. 8888930768 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.