दहा लाखांचा अपघाती विमा देणार; राज्य सरकारचा निर्णय
| मुंबई | प्रतिनिधी |
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक ऑनड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच ऑनड्युटी असताना अपघात होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (दि. 23) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. तसेच ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही योजना पुढे सुरु ठेवण्यात येणार असून, मेंढपाळ लाभार्थ्यांना आता रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांसदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.