। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. पावसाने सखल भागात पाणी साचलेले आहे. तर रस्त्यांवर पाणीचे पाणी झाल्याने, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आले आहे, उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल. हे सगळे पर्यटक बंगल्यात बसले होते, मात्र बाहेर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याची कल्पना यांना नव्हती. बाहेर चहुबाजूंनी पाणी झाल्याचे दिसून आले. आता या सर्व पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे.







