पाच जण जखमी
| पनवेल | वार्ताहर |
जुना पुणे-मुंबई महामार्गावरून पनवेलकडे एर्टीगा गाडी घेऊन पहाटेच्या वेळी अजय गिरे (21) व त्याचे सहकारी जात असताना बारवई गावाच्या हद्दीत त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या खाली येऊन पलटी झाली. या अपघातात गाडी चालक अजय गिरे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेले इतर 5 सहकारी जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.