| ठाणे | प्रतिनिधी |
विरारमधुन एक धक्कादायक बातमी समाेर येत आहे. ठाण्याचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे (47) यांची विरारच्या अर्नाळामध्ये रविवारी (दि.28) हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून मोरे हे अचानक कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मिलिंद मोरे हे रविवारी नवाबपूर येथील सेवन सी रिसॉर्टमध्ये कुटुंबीयासमवेत आले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या पुतण्याला एका रिक्षा चालकाने धडक दिली. यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि या रिक्षा चालकाने आपल्या साथीदारांना बोलवून मोरे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या तीन ते चार मित्र परिवाराला मारहाण केली. या मारहाणीत मिलिंद मोरे यांना वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती अर्नाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.







