। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
पावसात जास्तीत जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात पडणार्या पावसाचा फायदा वृक्ष लागवडीसाठी करून घेण्यासाठी वन विभाग जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे. यावेळी वन खात्याने बेल वृक्ष पर्यावरणपूरक असल्याने त्याची लागवड करण्याचे ठरवले आहे. वन परीक्षेत्रातील परिमंडळ वन अधिकारी कार्यालय तीनवीरा व पर्यावरण क्षेत्रात अग्रेसर असणारी आगाखान एजन्सी फॉर हॅबिट्याट संस्था यांनी संयुक्तरित्या सुमारे 500 बेलवृक्षाच्या रोपांची लागवड मापगाव येथील कनकेश्वर डोंगरावर नुकतीच केली आहे.
यावेळी परिमंडळ वन अधिकारी डॉ. निलेश चांदोरकर, तीनवीरा वनरक्षक सुरज सारंगे, संस्थेच्या असोशिएट स्नेहल पाटील, जयेश नागावकर, समृद्धी पाटील अंजली पेडणेकर, शीतल पाटील, अभिजीत वेगुलेॅकर विराज बांदिवडेकर व अनेक पर्यटक या वृक्षारोपणात सहभागी झाले होते. आगाखान एजन्सी फॉर हॅबिट्याट संस्थेच्यावतीने अमृता पराडकर यांनी मोफत रोपे उपलब्ध करून कार्यक्रमाचे नियोजन केले होते.