22 जणांच्या मृत्यूची नोंद
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात दिवसभरात 429 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 40,629 इतकी झाली आहे तर एकाच दिवसांत 22 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील मृत्यू झालेल्यांची संख्या 1378 झाली आहे. त्यात सोमवारी मृत्यू झालेल्यांची संख्या 9 तर उर्वरित 13 अन्य दिवसांतील आहेत.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 429 रुग्ण सापडले. यापैकी अँटिजन चाचणीत 170 आणि आरटीपीसीआर चाचणीत 309 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या 24 तासांत झालेल्या चाचणीत 2147 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 1,87,575 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सोमवारी 552 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 34,764 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 4487 रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 22 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी 9 जणांचा मृत्यू झाला. त्यात संगमेश्वर 4 रत्नागिरी आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि लांजा तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. दोन महिला आणि सात पुरुष रुग्णांचा एका दिवसांत मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी झालेल्या 13 जणांच्या मृत्यूची नोंदही सोमवारी झाली आहे.