| अलिबाग | वार्ताहर |
राज्य परिवहन रायगड विभागासाठी मानद तत्त्वावर दोन समुपदेशक पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु, या तारखेस 14 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य परिवहन विभागाचे रायगड विभाग नियंत्रक यांनी दिली. तसेच जाहितरातीत नमूद केलेल्या इतर अटी व शर्तींमध्ये काहीही बदल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
तरी समुपदेशक पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृषीवलमध्ये दि. 13 जून रोजी प्रसिद्ध झालेली पाहावी. तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी विभाग नियंत्रक, राज्य परिवहन विभाग, पेण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.







