टॅक्सी-चालक मालक संघटनेचे मागणी
। कर्जत । प्रतिनिधी ।
माथेरान घाटात वॉटर पॉईप स्टेशनजवळील रस्त्यावर असलेले धोकादायक झाड पडण्याआधी ते काढून टाकण्यात यावे, अशी मागणी टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी केली आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात शनिवारी गर्दी असतांना एक झाड पडले होते. नशीब बलवत्तर म्हणून एक मोटार सायकलस्वार थोडक्यात बचावला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून हे धोकादायक झाड पडण्याआधी काढून टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार हे झाड पुर्णपणे सुकले असून ते मुळासकट रस्तावर पडून मोठी दुर्घटना घडू शकते. तरी संबधित विभागाने लक्ष घालून ते झाड त्वरित काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.