| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत-खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख वेदिका कांबळी आणि नागपूर संपर्कप्रमुख मंदाकिनी भावे यांचा मतदारसंघात दौऱ्याच्या दरम्यान जिल्हा संघटक, माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि सर्व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या समवेत कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक अडकमोल आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेण्यात आली. तसेच, पंचायत समितीच्या कार्यालयाला देखील भेट दिली. त्यानंतर येथील श्रीमती मंजुळा वसंत जोशी सभागृहातील छत्रपती शिवाजी मंडळ आयोजित रांगोळी प्रदर्शन, रायगड दर्शन छायाचित्र, संग्रहित वस्तू प्रदर्शन आणि व्यंगचित्रकार विशाल सुरावकर यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट दिली. दरम्यान, तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांची शिवालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, शहर प्रमुख निलेश घरत, युवा सेना शहर अधिकारी गौरव भानुसघरे, तालुका संघटक करुणा बडेकर, मयुरी गजमल, नीता मांडे, योगिता डागा, जिल्हा परिषद सदस्य सुनिता मोरे, पंचायत समिती सदस्य नमिता श्रीखंडे, नगरसेविका सुचिता खोत, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते.






