नागोठण्यात काँग्रेसला खिंडार
नागोठणे | वार्ताहर |
रोहा पं.स.विद्यमान सदस्य बिलाल कुरेशी व त्यांचे पुतणे जोयेब कुरेशी यांनी रविवारी सुतारवाडी येथील गीताबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी बिलाल कुरेशी व जोयेब कुरेशी यांचे पक्षात स्वागत करून खासदार सुनिल तटकरे यांनी समाधान व्यक्त केले. या पक्ष प्रवेश सोहळ्यास नागोठण्यातील राष्ट्रवादीचे नेते,कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष प्रवेश सोहळ्यापूर्वी रोहिदास हातनोलकर यांची राष्ट्वादीच्या शहर सचिवपदी तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागोठणे शहर उपाध्यक्षपदी मोहल्ल्यातील धडाडीचे कार्यकर्ते जिशान सय्यद यांची निवड करण्यात आली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी जोयेब सय्यद व रोहिदास हातनोलकर यांचे अभिनंदन केले.