मुंबई | प्रतिनिधी |
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर 10 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा झटका मानला जातोय. जगदीश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना भाजपच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे निवडणूक रिंगणात असतील. त्यामुळे देवलूर विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.