| कोर्लई | वार्ताहर |
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मुरुड तालुक्यातील काशिद किनारा पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला होता. परंतु, आता हा किनारा पर्यटनासाठी खुला झाल्याचे येथील स्टॉल्सधारकांकडून सांगण्यात आले.
पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेला मुरुड तालुक्यातील काशिद किनारा पावसाळ्यात दोन महिने बंद करण्यात आला होता. काशिद किनार्यावरील विविध खाद्यपदार्थ, खाद्यपेय स्टॉल्स दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात यंदा दि.18 जून ते दि.14 ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्यात आले होते. पावसाळ्यानंतर दि.15 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले आहेत. पावसाळ्यानंतर काशिद किनारा सुरू करण्यात आल्याने पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.