| कोर्लई | वार्ताहर |
गेल्या आठवड्यापासून पावसाने जवळजवळ पाठ फिरवल्याने हवामानातील बदल होऊन घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुरुडकरांना अखेर शुक्रवारी (दि. 23) दुपारनंतर श्रावणसरी बरसल्याने दिलासा मिळाला.
श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन हवामानात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाली होती. तापमानाचा पारा 36 अंशांच्या वर चढला होता. उष्णतेच्या काहिलीने अनेकांनी घरातच राहाणे पसंत केले होते. त्यामुळे बाजारपेठेत तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत होती. शुक्रवारी सकाळी पडलेल्या उन्हानंतर दुपारच्या वेळी हवामानात बदल होऊन प्रचंड उकाड्यानंतर श्रावणसरी बरसल्याने मुरुडकरांना दिलासा मिळाला. यामुळे शेतातील भातपिकालाही जीवदान मिळाले आहे.







