। माणगाव । वार्ताहर ।
माणगावामध्ये अज्ञात कारणास्तव एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.30) रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली.
अमित कॉम्प्लेक्स माणगाव येथील अक्षय राजू मोहिते (23) याने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव माणगाव-पुणे रस्त्यालगत असलेल्या वक्रतुंड इंटरप्रायजेस या गाळ्यामधील वरील लोखंडी पाईपला नॉयलानच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला उपचाराकरिता माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.