। अलिबाग । प्रतिनिधी।
सकल मराठा समाज चोंढी विभागाकडून गणपती घाट चोंढी आणि दत्त मंदिर साईनगरयेथे वॄक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकल मराठा समाज तालुका अध्यक्ष नरेश सावंत, चोंढी विभागीय अध्यक्ष जितेंद्र जरंडे, चोंढी, किहीम, बामणसुरे, बोंबटकर पाडा, कातळपाडा, सातिर्जे, झिराड पाडा, आवास, सासवने, धोकवडे भागातील बहुसंख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
सकल मराठा समाज चोंढी विभाग तालुक्यात अतिशय सक्रिय असून या विभागामार्फत विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गणपती घाट चोंढी आणि दत्त मंदिर साईनगर येथे वॄक्षारोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण तालुका सदस्या विणा जाधव, किहीम सदस्या व मराठा गाव सदस्या जागृती जरंडे, गाव सदस्या कॄतिका किसन गायकवाड, गाव सदस्या सारिका आमले, उपस्थित महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते झाले.