| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील 36 जागांसाठी महाविकास आघाडीत सध्या बैठका सुरू आहेत. लवकरच इथल्या जागांबाबत अंतिम फॉर्म्युला समोर येणार आहे. तत्पूर्वी, ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण असतील ती यादी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. त्यात आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतूनच निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या संभाव्य उमेदवारांमध्ये आदित्य ठाकरे (वरळी), तेजस्विनी घोसाळकर (दहिसर), वरूण सरदेसाई (वांद्रे पूर्व), सुनील प्रभू (दिंडोशी), सुनील राऊत (विक्रोळी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), संजय पोतनीस (कलिना), प्रविणा मोरजकर (कुर्ला), श्रद्धा जाधव (वडाळा), अमोल किर्तीकर (जोगेश्वरी), निरव बारोट (चारकोप), समीर देसाई (गोरेगाव), रमेश कोरगावकर (भांडूप), ईश्वर तायडे (चांदिवली), सचिन अहिर किंवा विशाखा राऊत (दादर माहिम), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत मुंबईच्या 36 जागांसाठी आतापर्यंत 2 बैठका पार पडल्या आहेत. त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळतील असं बोललं जात आहे. ठाकरे गटाने 20-22 जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यात जे विद्यमान आमदार ठाकरे गटासोबत आहेत त्यांना पुन्हा एकदा 2024 च्या निवडणुकीत उतरवलं जाईल. त्याशिवाय नवोदित चेहर्यांनाही संधी दिली जाणार आहे.