। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या दीप्ती जीवनजीला तेलंगणा सरकारने 1 कोटी बक्षीस, द्वितीय श्रेणीतील नोकरी आणि वारंगलमध्ये 500 चौरस यार्ड जमीन देण्याचे जाहीर केली आहे. दीप्तीने भारतासाठी महिलांच्या 400 मीटर टी-20 शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. ही शर्यत दीप्तीने 55.82 सेकंदात पूर्ण केली होती.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी अधिकार्यांना बक्षीसे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि तिचे प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते एन. रमेश यांनाही 10 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच, पॅरालिम्पिकमधील इतर खेळाडूंना प्रशिक्षण आणि अन्य प्रकारची मदत पुरवण्याचे अधिकार्यांना निर्देश दिले आहेत.
दीप्तीच्या पॅरालिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नासाठी तिच्या रोजंदारीवर काम करणार्या पालकांनी आठ वर्षांपूर्वी वारंगलमधील कल्लेडा येथील अर्धा एकर जमीन विकली होती. जी की दीप्तीने आपल्या कमाईमधून परत विकत घेतली आहे. परंतु, दीप्तीच्या आर्थिक सहकार्यासाठी तिच्या पालकांनी केलेल्या या त्यागाबद्दल सरकारने तिला वारंगलमध्ये 500 चौरस यार्ड जमीन जाहीर केली आहे.