। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर-लोहारवाडी येथ गुरूवारी (दि.12) विडी आणि माचिस घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीवर कोयतीने वार केल्याची घटना घडली आहे. पदम जुबीलाल दमाई (35) असे पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरूवारी सायंकाळी पदमने पत्नीकडे विडी आणि माचिस आणण्यासाठी पैसे मागितले होते. तेव्हा पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याने तिला धकलाबुकल करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, पत्नी त्याला बडबडायला लागल्याने त्याचा राग मनात धरुन त्याने पत्नीच्या डाव्या पायावर कोयतीने वार करून जबर दुखापत केली आहे.