। पुणे । प्रतिनिधी ।
अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे सत्र चालू असतानाच भोर तालुक्यातही एक अशीच घटना घडली आहे. एका अडीच वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात वर्षाच्या चिमुकलीवर एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे शेजारी राहतात. दोन वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे. मंगळवारी (दि.17) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलाने मुलीला त्याच्या खोलीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, मुलाने दरवाजा उघडला नाही. तिने आरडाओरडा केला असता आरोपी मुलगा मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून तिथून पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आणि आरोपी मुलाला अटक केली.