आमच्यावरील आरोप खपवून घेणार नाही: पारधी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील आदिवासी महिलांना गैरसमजुतीमधून बदनाम करण्याचा कट केला जात आहे. मात्र, त्यानंतर त्याच महिलांनी प्रसिद्धी माध्यमाच्या समोर बोलताना आम्हला कोणीही पैसे देण्याचे आमिष दाखवले नव्हते, अशी कबुली दिली. तर, आम्ही आदिवासी म्हणून कोणीही आमच्यावर आरोप करू नका, असा इशारा आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी दिला.
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी येथील आदिवासी समाजाच्या महिलांनी 15 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर 16 सप्टेंबर याच महिलांचा आदिवासी नृत्याचा कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आदल्या दिवशी पक्ष प्रवेश करायला ठाकरे पक्षाने तुम्हाला काय दिले, असा प्रश्न काहींनी विचारला असता ठाकरे पक्षात प्रवेश करणारी आदिवासी महिला यांनी नितीन सावंत यांनी आम्हाला दीड लाख रुपये बचत गटाला देण्याचे कबूल केले आहे असे सांगितले आणि त्यानंतर शिवसेना पक्षाकडून त्या महिलेची व्हिडीओ व्हायरल करण्यात आली आणि शिवसेना ठाकरे पक्षावर आरोप करण्यात आले. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी सर्व माध्यमाच्या प्रतिनिधी यांना सोबत घेऊन ताडवाडी गाठले. तेथे ज्या आदिवासी महिलेने नितीन सावंत हे आमच्या बचत गटाच्या खात्यावर दीड लाख टाकणार आहेत असे जाहीर केले होते. त्याच आदिवासी महिलेने ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत तसेच अन्य पदाधिकारी आणि आदिवासी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ताडवाडीमध्ये त्याच आदिवासी महिलांनी दीड लाख रुपयांबद्दल खुलासा केला. आम्ही आमच्या स्वखुशीने नितीन सावंत यांच्या कार्यालयात गेलो आणि शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आम्ही हसत-हसत बोललेली चर्चा याची व्हिडीओ बनविण्यात आली आणि त्यानंतर आमची बदनामी सुरु झाली. आम्ही आदिवासी असल्याने आमच्या राजकीय फायद्यासाठी चिखलफेक केली जात आहे, हे चुकीचे असल्याचे मत आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी केला आहे. मात्र, या प्रकारानंतर आदिवासी कार्यकर्त्यांचे प्रवेश घेताना राजकीय कसरत करावी लागणार असून, आगामी निवडणुकांमध्ये सर्व पक्ष काळजी घेतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.