सई वावेकर, सार्थक कासारचे उज्ज्वल यश
| तळा | वार्ताहर |
गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर तळाचे रायगड जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत सलग दुसर्या वर्षी सई वावेकर हिने यश मिळवले असून, मानाचा तुरा रोवला आहे. त्याचबरोबर वेदक विद्यामंदिरचे नांव मोठे केले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय इनलाईन रोलर स्केटिंग स्पर्धेत सईने 14 वर्षे वयोगट मुली इनलाइन रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक आणि सार्थक राकेश कासार इयत्ता दहावी याने 17 वर्षे वयोगट मुलगे इनलाइन रोलर स्केटिंग या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक संपादन केला आहे. दोन्ही विद्यार्थीचे मुंबई विभागाच्या होणार्या विभागीय स्पर्धेकरिता पात्र झाले आहेत. दोन्ही यशवंत गुणवंत स्पर्धकांचे विविध स्तरांवर हार्दिक अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.