। चिरनेर । प्रतिनिधी ।
बेलापूर येथील कोकण भवन राज्य व्यवस्थापन कक्ष येथे या विभागातील सहाय्यक गटविकास अधिकारी/नियंत्रण अधिकारी हे पद रिक्त झाले होते. या पदावर उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर यांना ग्रामविकास विभाग शासन आदेशानुसार, 20 सप्टेंबर पदोन्नती मिळाल्यामुळे प्रतिनियुक्तीने त्यांची नियुक्ती ग्रामिण गृह निर्माण विभागात सहाय्यक गटविकास अधिकारी/नियंत्रण अधिकारीपदी करण्यात आली आहे. लवकरच ते आपल्या पदाचा पदभार स्विकारून कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माणगाव व उरण येथे ग्रामसेवक म्हणून पाच वर्ष, तर ग्रामविकास अधिकारी म्हणून उरण, पनवेल येथे नऊ वर्ष आणि विस्तार अधिकारी म्हणून उरण, पनवेल, पेण येथे वीस वर्ष अशी एकूण 34 वर्ष त्यांनी उत्तम रीतीने सेवा बजावली. यामध्ये विविध पदांवर सेवा बजावताना, कार्यालयात येणार्या नागरिकांना नेहमीच मार्गदर्शन करून सहकार्य केले. आपल्या सेवेसी प्रामाणिक असणार्या अनिल नारंगीकर यांची सहाय्यक गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल जिल्हा स्तरावरुन डेप्युटी इंजिनिअर देवांग, माजी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पाटील व शेलके, माजी गटविकास अधिकारी तेटगुरे, इंजिनियर अनिल जाधव, जिल्हा व तालुक्यातील गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.