। रायगड । प्रतिनिधी ।
नुकत्याच झालेल्या जळगाव येथे ट्रेडिशनल रेसलिंग या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि पनवेल तालुक्यातील मुलांनी सुवर्ण कामगिरी केली. जेएसएम कॉलेजची वेदिका संतोष कवळे (नवगाव) हिने बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक आणि मास रेसलिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. पीएनपी वेश्वी कॉलेजची सुरभी अजित पाटील (मल्याण) हिने बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक आणि पेन क्रिएशनमध्ये सुवर्णपदक पटकावले. तीन सुवर्णपदक मिळवणारी ती स्पर्धेची पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. म्हणून तिचा विशेष मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
महाजने गावाची श्रमीका श्रीधर पाटील हिने एक सुवर्णपदक आणि एक रजतपदक पटकावले. लायाबा सेहेजाद अन्सारी-रामराज ही दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली. विरेन पाटील-रेवस सुवर्णपदक, अंश आल्हाद नाईक-कुणे सुवर्णपदक, अनुष्का परमेश्वर पोले-सार्तिजे हिने दोन सुवर्णपदकं जिंकली. श्रवण संदीप भोईर-दिघोडी दोन सुवर्णपदक, जिग्नेश गजानन कोळी-अलिबाग कोळीवाडा सुवर्णपदक आणि रजतपदक, राहुल ओंमबादुर गुरुम-सोगाव एक रजत आणि एक सुवर्णपदक, छवी सागर अग्रवाल-पेझारी मास रेसलिंग सुवर्णपदक, पनवेल कराटे क्लासमधून स्पंदन योगेश अंकुश-पनवेल याने सुवर्णपदक पदक पटकावले. विघ्नेश संतोष पानसरे-तळोजा सुवर्णपदक, सोहम पाटील-पनवेल सुवर्णपदक, योगेश्वर अमर राहटे-पनवेल सुवर्णपदक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. रायगडच्या मुलांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त सुवर्ण पदके मिळवली. म्हणून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सी ए तांबोळी आणि सचिन वाघ यांच्यासह अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली. मुलांबरोबर राष्ट्रीय पंच रसिका मडवी पनवेल तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कवळे यांचा उत्कृष्ट पंच म्हणून ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. विजयी स्पर्धकांची 3 ते 6 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तराखंड येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.