| मुंबई | प्रतिनिधी |
योग्य पद्धतीने देखभाल न केल्यामुळे अनेक ठिकाणी चढलेला गंज, कमकुवत फ्रेम, सदोष वेल्डिंग आणि चुकीचे डिझाईन या चार प्रमुख कारणांमुळे मालवणमधील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांतच कोसळला, असा ठपका याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या सोळा पानी अहवालात ठेवला आहे. छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता. त्यानंतर याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन करून समितीला 30 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे.