। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग शहरातील बाजारपेठेच्या महाजन हॉलमध्ये गुरूवारी (दि.3) घटस्थापना विधी संपन्न झाला. या मंडळाची स्थापना अलिबागमधील गुजराती समाजाच्या पुढाकाराने झाली असून या वर्षी मंडळाचे 64वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष मयूर डाबी (बाडा) असून मंडळाच्या समिती सदस्यांमध्ये सुरेश जैन, राजेश छेडा, अंकित भानुशाली, नीरज भानुशाली, सैय्यम संघवी आणि प्रथमेश गांधी यांचा समावेश आहे. घटस्थापनेची पूजा बाजारपेठेतील जितेंद्र नरेंद्र मेहता आणि कृपा जितेंद्र मेहता या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.
दरवर्षी शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या मंडळाच्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहतात. या नियमितपणे या उत्सवात सहभागी होऊन, स्थानिक गुजराती समाजासोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतात. याशिवाय, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अनिल चोपडा देखील या सोहळ्याला हजेरी लावतात. अलिबागमधील गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या स्थापनेमुळे स्थानिक समाजात उत्साह संचारला आहे.